Monday, 13 March 2017

शब्द

शब्द आहेत खरे दोन अक्षरी,
पण त्याची किमया लय भारी,
शब्दांवरच भुलते ही दुनिया सारी,

शब्द खूप काही सांगून जातात,
शब्द खूप काही बोलूनी जातात,

शब्दच आपल्याला सावरायला शिकवतात,
रडता रडता हसायला शिकवतात,

शब्दांमुळेच जुळतात मनाच्या तारा,
शब्दांमुळेच चढतो रागाचा पारा,
शब्दांमुळेच हरवतो जीवनातला गोडवा.

No comments:

Post a Comment