Tuesday 30 May 2017

Me and My Father

मी नि माझे बाबा...........

मी नि माझे बाबा. तशी लहानपणापासूनच मी त्यांची लाडकी ,शेंडेफळच म्हणाणा..
 आठवतय मला मी इयत्ता नवव्वीत असताना शाळेच्या पिकनिकला गेले होते. तीन  दिवसांची पिकनिक होती.पहिल्यांदाच आई बाबांपासून लांब गेले होते.ऐरवी मी  एक दिवसाच्या पिकनिकला बरेचदा गेले पण राहण्याची अन् तेही आई बाबांशिवाय पहिलीच वेळ.
  तसे बाबा या पिकनिकसाठी तयारच नव्हते पण मी नाराज होईन ,मला  वाईट वाटेल आणि माझ्या मैत्रिणीच्या आई -बाबांनीही मैत्रिणींना पिकनिकला जाण्याची परवानगी दिली म्हणूनच त्यांनी मला जाण्याची परवानगी दिली..खरं तर बाबांना मी तिकडे कशी राहिन,मला झोप लागेल का??मी घाबरले वगैरे तर कोणं मला बघेल म्हणूनच बाबांचा नकार होता.
आईने त्यांना कसंबसं समजावलं..
  पिकनिकला जाण्याचा दिवस उजाडला.बाबाच मला सकाळी शाळेत सोडायला आले होते. सगळं नीट ठेवलस ना ?काही विसरली नाहीस ना. स्वतःचा ग्रुप सोडून कुठेही जाऊ नकोस . व्यवस्थित रहा. असं सगळं बाबा मला पुन्हा पुन्हा सांगत होते. मी म्हटलं बाबा ,आईने मला सगळं सांगितल आहे.तुम्ही नका काळजी करू असं मी म्हटलं तोवर आम्ही शाळेत पोहोचलो होतो अन् मी मैत्रिणीमध्ये गेले.मी या पिकनिकसाठी फारच उत्साही होते.
थोड्या वेळात आम्हा सगळ्यांना पालकांसहित एका क्लासरूममध्ये बसण्यास सांगितलं.
 आम्ही सांगितल्याप्रमाणे जाऊन बसलो.आम्हाला थोडया फार सूचना दिल्या गेल्या आणि त्यानंतर आमची बस परत किती वाजता पोहोचेल ?आम्ही कुठे राहणार याबद्दल माहिती सांगितली.आम्ही ज्या ठिकाणी राहणार  तिथला नंबरही देण्यात आला.कोणी लिहून घेतला की नाही ?मला कल्पना नाही. पण मला मात्र बाबांनी तो नंबर लिहून देण्यास सांगितला.मीही त्यांना लिहून दिला.
 त्यानंतर थोड्याच वेळात आमची बस निघाली.बाबा आमची बस निघेपर्यंत थांबले होते.मी मात्र फुल पिकनिकच्या मुडमध्ये होते.
हुश्श एकदाचे आम्ही आमच्या सहलीच्या ठिकाणी महाबळेश्वरला  पोहोचलो.तेवहा साधारण पावणे आठ वाजले होते.नेमकी त्यावेळेस तिथली वीज गेली होती.आम्हाला पंधरा वीस मिनिटे देऊन ,आपआपल्या बॅगा रूममध्ये ठेवून लगेच यायला सांगितले. मी थोडेफार पैसे जवळ घेतले आणि बाकीचे बॅगेत ठेवले.आम्ही सगळे एकत्र जमल्या नंतर  शिक्षक आम्हाला जवळच्या बाजारपेठेत घेऊन गेले.आम्ही ग्रुप ग्रुपने एकमेकांचा हात पकडून चालत होतो.आम्ही थोडंस खायचे पदार्थ घेतले ,थोडस फिरलोआणि मग नंतर एका तासाने हाॅटेलवर आलो. तोच जयकर बाईंनी दुपटे असा आवाज तेव्हा मात्र मी घाबरले.जयकर बाई जवळ येत म्हटल्या,दुपटे तूच ना गं.मी घाबरतंच हो  म्हटलं.त्यावर त्या म्हटल्या तुझ्या बाबांचा फोन आला होता. तेव्हा मात्र मी आणखीन घाबरले.जयकर बाई म्हटल्या बाबांनी तुझ्यासाठी फोन केला होता.तू कशी आहेस ??यासाठी त्यांनी फोन केला होता.मी त्यांना सांगितल की मुलं आता बाजारात गेली आहेत. तेव्हा कुठे मी सुटकेचा श्वास सोडला. बाई म्हटल्या,बाबांची फारच लाडकी आहेस वाटतं .बाबांचा फार जीव तुझ्यावर.मी म्हटल ,हो बाई. खर सांगायचं तर त्यावेळी मला खूपच कसंतरी वाटलं होतं. कोणाच्याही आई-वडीलांचा फोन आला नव्हता .मैत्रिणी काय म्हणत असतील ?शिक्षक काय म्हणतील ?एवढं कसलं प्रेम  ?पण जयकर बाईंचे ते दोन शब्द ऐकून मी फार सुखावले. त्यांचे ते दोन शब्द होते ,फार लकी आहेस तू. तुझे बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात...
 पिकनिकवरून घरी येण्याच्या दिवशी तर बाबांनी कमालच केली.आमची बस मध्येच बंद पडल्यामुळे आम्हाला मुंबईला परत यायला उशिर होणार असे प्रत्येकाने आपआपल्या घरी कळवले. निदान तीन ते चार तास उशिराने आम्ही  मुंबईला पोहोचणार होतो.पण बाबांनी तोवर  घरापासून ते शाळा अश्या  निदान सहा ते सात वेळ्या फेञ्या घातल्या.बाबां खूपच बैचेन झाले होते.माझी पोरं घरी येई पय॔ंत मी जेवणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितल.आईने बाबांना जेवण्यासाठी       खूप विनंती केली.पण त्यांनी  काहीही ऐकलं नाही.त्या दिवशी आमची बस रात्री एक वाजता शाळेच्या आवारात पोचली. मला अगदी स्पष्ट आठवतय भेटल्या भेटल्या बाबांनी मला मिठीत घेतले. मीही त्यांना हळूच एक पापी दिली.मला लबाड म्हणत थोडेसे ते हसले.. मी ही बाबांना खूप मिस केलं होतं.पहिल्यांदा  मी बाबांना चिंतित पाहिलं होतं. असे हे माझे बाबा वरून कडक पण आतून नरम.

No comments:

Post a Comment