Monday 29 May 2017

Thinking need to change about ladies

आमच्या ऑफिसने इव्हेंट अरेंज केल होतं. ते फक्त लेडीजसाठीच होतं.त्या इव्हेंटमध्ये प्रत्येकाला आपल्या मनातलं बोलायची संधी होती.सगळे अगदी बिनधास्त बोलत होते.
त्यामध्ये काही जणींनी आपला अनुभव सांगितला तेव्हा आम्हीही ऐकून थोडे थबकलो . काही जणी सेल्स डिपाट॔मध्ये आहेत.लेडीजने जर बिझनेस आणला किंवा चांगले यूनिट केले तर ऑफिसमधले पुरूष सहकारी सहज बोलतात की तुम्ही लेडीज आहात म्हणून कस्टमरने तुम्हाला बिझनेस दिला. असे बोलून सहज रिकामे होतात.
याचा अथ॔ काय???आम्ही जे काम मन लावून करतो त्याला काहीच अथ॔ नाही.नेहमी उलटच विचार केला जातो.
हे तर काहीच नाही.आजही काही ऑफिसेसमध्ये स्त्रियांना म्हणावे तेवढे प्राधान्य दिले जात नाही.टॅलेण्ट असूनही मागेच आहेत.
आणि समजा एखादी स्त्री पुढे जात असेल तर सहज बोललं जात की तिचं नि बाॅसच काहीतरी लफड आहे वगैरे वगैरे बोलून मोकळे होतात.काहीजण असतात तशी पण यात सगळ्यांनाच गृहीत धरल जातं.
ती एकाचवेळी कितीतरी जबाबदाऽया सांभाळत असली तरीही तिला आजही कमीच लेखलं जातं.
आजच्या या 21व्या शतकात शिकलेली पिढीही स्त्रियांना मान देत नाहीत तर त्यांचा अवमान करतात आणि असे ऐकून फार वाईट वाटते.
देशाला स्वातंत्र्य मिळून बरीच वष॔ झाली तरीही आपले विचार मात्र अजून बदलेले नाहीत.आपण आपल्या पिढीसमोर काय आदश॔ ठेवतो हे सारेजण विसरले आहेत.हे कुठेतरी थांबायला हवं..खरच थांबायला हवं.......................

No comments:

Post a Comment